Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यांच्या नवीन पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. नवीन पालक मंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये १९ जणांवर विविध जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सर्वाधिक सहा जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी दिली आहे. यामध्ये नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. नियोजन मंत्री म्हणून या जिल्ह्यांची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर असणार आहे. पुण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी चंद्रकांत पाटील यांच्या खांद्यावर असणार आहे. तर मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर हे असणार आहेत. याशिवाय कोल्हापूरचे पालकमंत्रीही ते असतील. मंगलप्रभात लोढा यांच्याकडे मुंबई उपनगरचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.
पालक मंत्र्यांची नावे आणि जिल्हे
नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर ; #मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा

➡️ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे #पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल.

 इतर पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे

➡️ राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर, 

➡️ सुधीर मुनगंटीवार-चंद्रपूर,गोंदिया, 

➡️ चंद्रकांत दादा पाटील- पुणे,

➡️ विजयकुमार गावित- नंदुरबार,

➡️ गिरीश महाजन- धुळे,लातूर, नांदेड, 

➡️ गुलाबराव पाटील - जळगाव, बुलढाणा

➡️ दादा भुसे- नाशिक, 

➡️ संजय राठोड- यवतमाळ, वाशिम

➡️ सुरेश खाडे- सांगली,

➡️ संदिपान भुमरे -औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)

➡️ उदय सामंत- रत्नागिरी, रायगड,

➡️ तानाजी सावंत-परभणी, उस्मानाबाद (धाराशिव)

➡️ रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग,

➡️ अब्दुल सत्तार- हिंगोली, 

➡️ दीपक केसरकर -मुंबई शहर , कोल्हापूर, 

➡️ अतुल सावे - जालना, बीड,

➡️ शंभूराज देसाई - सातारा, ठाणे,

➡️ मंगलप्रभात लोढा -मुंबई उपनगर