Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

श्रीराम मंदिरातील गोशाळेत ४५ गोवंशांना लम्पी प्रतिबंधात्मक लसीकरण



पाचोरा प्रतिनिधी जावीद शेख

 बाल हक्क संरक्षण समितीचे पाचोरा तालुका अध्यक्ष निलेश मराठे यांच्या संकल्पनेतून व वृंदावन हाॅस्पिटलचे संचालक डॉ. निळकंठ पाटील यांच्या प्रयत्नातून शहरातील जामनेर रोडवरील श्रीराम मंदिरातील गोशाळेत आज दि. २० सप्टेंबर रोजी लम्पी या आजाराला आळा घालण्यासाठी लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली होती या मोहिमेत डॉ. परेश पाटील यांनी गोशाळेतील सुमारे ४५ गोवंशांना लसीकरण केले. लसीकरणा प्रसंगी अयोध्या येथील विष्णुदासजी महाराज, श्रीराम मंदिर गादीपती निळकंठ महाराज, गजानन जोशी, बाल हक्क संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष मुकेश जगताप, तालुका अध्यक्ष निलेश मराठे, शहर अध्यक्ष नंदु शेलकर, बजरंग दल प्रखंड मंत्री योगेश सोनार, एन. एस. युवा मंचचे अध्यक्ष नंदु शेलार, गुरुलाल पवार (साजगांव), जितु लोणारी, अनुप जैन, गणेश कोळी, वाल्मिक महाराज, लकी पाटील, अनिल पाटील उपस्थित होते. लसीकरणानंतर डॉ. परेश पाटील यांनी गोवंशांची घ्यावयाची काळजी याबाबत संबंधितांना सुचना दिल्या. आहेत,