नांदुरा प्रतिनिधी
जागतिक फार्मसिस्ट दिनानिमित्य नांदुरा तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन च्या वतीने नांदुरा केमिस्ट भवन येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदुरा तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष लक्ष्मणराव पाटील होते तर प्रमुख उपस्थिती मध्ये बुलढाणा जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रेम काका जैन व कार्यकारी सदस्य गजानन भाऊ धनोकार होते प्रमुख सत्कार मूर्ती डॉ. विष्णू दळवी साहेब पशुधन विकास अधिकारी शेंबा, तसेच सामाजिक कार्यकर्ते व रुग्णसेवक श्री विलास भाऊ निंबोळकर अध्यक्ष ओम साई फाउंडेशन नांदुरा उपस्थित होते.
सर्वप्रथम *फार्मसिस्ट ओथ वाचन* फार्मासिस्ट श्री लक्ष्मण भाऊ वकटे यांनी उपस्थित फार्मासिस्ट बांधवांना दिली. त्यानंतर लंपी आजारात गोरक्षण येथे पशुवैद्यकीय सेवा देणारे डॉ.विष्णू दळवी साहेब यांचा सत्कार करण्यात आला, तसेच रुग्णसेवा कार्यात योगदान देणारे ओम साई फाउंडेशन चे विलास भाऊ निंबोळकर व त्यांच्या संपूर्ण टीमचा सत्कार करण्यात आला
तसेच थॅलेसेमिया ग्रस्त रुग्णांना आझाद क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात रक्तदान करणाऱ्या तसेच इतरत्र रक्तदान करणाऱ्या फार्मसिस्ट बांधवांचा सत्कारा मध्ये श्री विनायक शेजोळ,श्री लक्ष्मण वक्ते, तसेच रोशन बिचारे यांचा सत्कार घेण्यात आला, या प्रसंगी ओम साई फाउंडेशन च्या वतीने श्री गजानन भुसारी सर, श्री दिपक फाळके सर,तसेच श्री प्रेमकाका जैन व श्री गिरीश भाऊ चांडक यांनी आपले मनोगत व्यक्त केले, डॉ.विष्णू दळवी साहेबांनी सध्या गुरांमध्ये सुरू असलेल्या लंपी आजारावर उपस्थित फार्मसिस्ट बांधवांना उपयुक्त मोलाचे मार्गदर्शन करून
नांदुरा शहरातील विविध भागातील गाईंना असोसिएशनच्या वतीने लसीकरण मोहिमेत संपूर्ण प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन नांदुरा तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे सचिव विजय मनोहरराव डवंगे यांनी केले तर आभार प्रदर्शन रोशन बिचारे यांनी केले कार्यक्रमासाठी नांदुरा शहरातील परिसरातील फार्मासिस्ट बांधव उपस्थित होते.