पिडीत बालीका तिच्या एका महिन्याच्या मुलीसह जिल्हा बाल सुधार गृहात रवाना
मलकापुर:- तालुक्यातील ग्राम देवधाबा येथील आईवडिलांनी चौदा वर्षीय अल्पवयीन साक्षीचा मध्यस्ता मार्फत नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी येथील महेश मधुकर कळसकार या 29 वर्षीय तरुणाशी काही महिन्यांपूर्वी बालविवाह लावुन दिला, अल्पवयीन मुलीला सासरी पाठविल्यानंतर तिच्या पतीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याने तिने महिन्याभरापूर्वी एका गोंडस बाळाला जन्म दिला, बाळाला घेऊन साक्षी मलकापुर येथील उपजिल्हा रुग्णालयात लसीकरणासाठी आली असता आधारकार्डावरील जन्म तारखेच्या नोंदीवरून ती अल्पवयीन असल्याचे उघडकीस आले याबाबतची माहिती बुलढाणा येथील बाल संरक्षण अधिकारी यांना दिल्याने त्यांनी तात्काळ मलकापुर गाठत अल्पवयीन साक्षी व तिच्या एका महिन्याच्या बाळाला घेऊन बाल सुधार गृहात रवाना केले याबाबतची फिर्याद मलकापुर ग्रामीण पोलीस निरीक्षक एफ.सि.मिर्झा यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि.नामदेव तायडे यांनी दिली.
त्या अनुषंगाने ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये अल्पवयीन मुलीचा पती महेश मधुकर कळसकार, दिर विठ्ठल मधुकर कळसकार,सासरा मधुकर निनाजी कळसकार, मध्यस्थी रमेश लक्ष्मण धामोडे सर्व रा.वडनेर भोलजी ता.नांदुरा.नणंद नंबाबाई अनिल भोजने रा.कुऱ्हा (काकोडा) ता.मुक्ताईनगर, अल्पवयीन मुलीचे वडील नारायण तोताराम कऱ्हाडे,आई सरला नारायण कऱ्हाडे, भाऊ गजानन नारायण कऱ्हाडे सर्व रा.देवधाबा अश्या आठ जणांविरुद्ध कलम 376,376 (2) (एन),376 (3),34 भादवि तसेच पोकसो 4 (2),6,8 बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 कलम 9,10,11,जे जे ॲक्ट कायदा कलम 75 प्रमाणे गुन्हा दाखल झाला असुन नवरोबास पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास पो.नि एफ सी मिर्झा करीत आहे.