मलकापुर:- तालुक्यातील वाकोडी ग्रामपंचायत अंतर्गत जलजीवन मिशन मधून केंद्रीय वित्त आयोगाच्या माध्यमातून वाकोडी ग्रामपंचायत ला मिळणाऱ्या निधीतून हर घर नल या हेतूने वाकोडी गावातील एकूण 117 लाभार्थ्यांना पिण्याच्या पाण्याचा नळ देण्याच्या कामाचे उद्घाटन आज वाकोडी ग्रामपंचायतीच्या सरपंचा ममताताई हेलोडे, सिध्दार्थ हेल़ोडे,ग्रामपंचायत सदस्य गजानन ठोसर, दामोदर काजळे, माजी सरपंच अनिलसिंह गौर यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी योगेश काजळे,शांताराम पैहलवान, अजय तायडे, विलास म्हस्के,नीताबाई तायडे, रामा सोळंके, कैलास निकम समाधान जाधव सह ग्रामस्थ उपस्थित होते राष्ट्रपिता ते राष्ट्रनेता या अभियानांतर्गत 2 ऑक्टोंबर गांधी जयंती पर्यंत सदरचे काम पूर्ण करण्याचा ग्रामपंचायत वाकोडीचा मानस असून 2 ऑक्टोंबर रोजी संपूर्ण कनेक्शन धारकांना या नळ योजनेतून पिण्याचे पाणी दिले जाणार असल्याची माहिती वाकोडी ग्रा.प.चे सचिव कैलास चौधरी यांनी दिली आहे