Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सरकारने अतिवृष्टीची जाहीर केलेली मदत संतापजनक सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी-प्रशांत डिक्कर

 



जळगाव जामोद

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी १३ हजार ६०० रुपये मदत देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे, हा प्रकार म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा असून, सरकारने राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याचा आरोप स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी केला आहे, विदर्भ आणि मराठवाड्यात व राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. 

  खरीपाची पिके उध्वस्त झाली आणि इतर नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले, शेतकरी संकटात सापडला असतांना सरकारने १३ हजार ६०० रुपये हेक्टरी मदत देण्याचं जाहीर केलं ही शेतकऱ्यांची घोर फसवणूक सरकारने केल्याने शेतकरी प्रचंड संताप व्यक्त करीत आहेत, अतीवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी याकरीता लोकप्रतिनिधींनीचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील शेतकरी जिव धोक्यात घालून आंदोलनं करीत होते‌, पंरतु त्या वेळेस मात्र राज्यातील लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून सत्ता स्थापनेसाठी व मंत्रीपदासाठी मुंबईत ठाण मांडून होते. 

   त्या पाऊसामधे अनेक शेतकऱ्यांचे बळी गेले जनावरे वाहुन गेली शेतकरी सैरावैरा भटकत होता अक्षरशः शेतकरी मरणाच्या दारात उभा असुनही सरकारने शेतकऱ्यांना संकट समयी साथ दिली नाही, उलट जाणीवपूर्वक पिकाचे कमी नुकसान दाखवून दिशाभूल करणारी आकडेवारी प्रशासनामर्फत माहिती प्राप्त करीत सरकारने नुकसानिची हेक्टरी १३ हजार ६०० रुपये जाहीर केलेली मदत तोकडी असुन शेतकऱ्यांच्या अपेक्षा भंग करणारी आहे. त्यामुळे सरकारने वेळ काढुपणा न करता नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी अशी मागणी प्रशांत डिक्कर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना केली आहे,