आत्माराम ढेकळे,पुणे
पुणेः संत नरहरी महाराज जन्मोत्सव सोहळा सरदार बिडकर वाडा,श्रीक्षेत्र आळंदी देवाची येथे विविध कार्यक्रमाचेआयोजन करुन उत्साहात संपन्न झाला.या उत्सवात सुवर्णकार ,सराफ समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
गोपाळकृष्ण मंदीर ,सरदार बिडकर वाडा,आळंदी येथे समस्त सुवर्णकार,सराफ,ग्रामस्थ यांच्या वतीने 'संत नरहरी महाराज जन्मोत्सव सोहळा' आयोजित करण्यात आला होता.या सोहळ्यात ह.भ.प.पंडीत महाराज पोतदार यांनी"संत शिरोमणी नरहरी महाराज "यांच्या जीवनातील परमार्थिक प्रसंगाचे सुरेख वर्णन केले.या किर्तनात मृदंगाचार्य माऊली महाराज व गायनाचार्य तुकाराम महाराज यांनी उत्कृष्ट साथ दिली.तसेच विद्यार्थी वारकरी संस्था,आळंदीच्या बाल विद्यार्थ्यांनीही याप्रसंगी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन सेवा दिली. या कार्यक्रमात किर्तनकार पंडीत महाराज पोतदार,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पोपटराव बेदरे गुरुजी,प्रसिद्ध मुक्त पत्रकार आत्माराम ढेकळे आदी मान्यवरांचा गोपाळकृष्ण मंदीरचे विश्वस्त उमेश रामचंद्र बिडकर यांनी सत्कार केला.प्रारंभी येथील मंदिरातील गोपाळकृष्ण व संतशिरोमणी नरहरी महाराज प्रतिमाचे पुजन व आरती करण्यात आली.या उत्साहात प्रामुख्याने विद्यार्थी वारकरी संस्थेच्या बाल गोपाळ विद्यार्थ्यांना सरदार बिडकर महाराज यांनी प्रबोधन केल्यानंतर पसायदानाचे सुरेल असे पठण करुन घेतले.व सर्व विद्यार्थ्यांना याप्रसंगी खाऊ वाटप करण्यात आले.हा जन्मोत्सव सोहळा यशस्वी करण्यासाठी सुरेश खोल्लम,चंद्रकांत टाक,शरद पळसे,विनायक महामुनी,चंद्रकांत बिडकर,श्यामराव मलठणकर,गोपाळशेठ नांगरे,राजेंद्र शहाणे,प्रकाश शहाणे,दत्तात्रय महामुनी,ललितकुमार बिडकर,बाबा डफळ तसेच व्यावसायिक पेढी,सोनार संघटना आदींचा सहभाग होता.या उत्सवास उमेश बिडकर मित्र परिवारातील राजेंद्र पाटील,सतीश पडवळ,राजाभाऊ पाटील ,खांदवे पाटील,परदेशी साहेब,अण्णा नायर ,ठाकुर,कुर्हाडे आदी मान्यवर प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते.शेवटी सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.