क्रिडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बघून आई स्केटिंग अकँडमी बुलढाणा चे संचालक,श्री. देवानंद नेमाने एन.आय.एस कोच रोलबाँल यांचा रविवार, दिनांक १७ जुलै २०२२ रोजी मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी (रजि. ट्रस्ट) संस्थेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय गुणिजन गौरव महासंमेलन आणि पुरस्कार वितरण सोहळा मुंबई शहरातील सांस्कृतिक सभागृहात थाटात संपन्न झाला. महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील २५ क्षेत्रांतून पुरस्कारासाठी निवडलेल्या ३१ मानकऱ्यांना या सोहळ्यात मानाचा फेटा, मानकरी बॅच, महावस्त्र, गौरवपदक, सन्मानचिन्ह आणि मानपत्र या स्वरूपात राज्यस्तरीय गुणिजन तसेच गुरु सन्मान पुरस्कार थाटात प्रदान करण्यात आले. सुप्रसिद्ध इंटरनॅशनल टॅलेंट आयकॉन डॉ. जयलक्ष्मी सानिपीना राव या सोहळ्याला ऑनलाईन समारंभाध्यक्षा म्हणून उपस्थित होत्या. सुप्रसिद्ध कीर्तनकार, कवी आणि ज्येष्ठ पत्रकार ह. भ. प. श्री. शामसुंदर महाराज सोन्नर हे समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उपस्थित गुणिजन मानकऱ्यांना अधिकाधिक उत्कृष्ट आणि गुणवत्तापूर्ण कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. या समारंभाला उपस्थित विशेष निमंत्रित पाहुणे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. जनार्दन कोंडविलकर यांनी सर्व गुणिजनांना शुभेच्छा देऊन भारतीय संस्कृतीचा प्रचार व प्रसार करण्याचे आवाहन केले. सुप्रसिद्ध समाजसेविका आणि समुपदेशिका सौ. मिनाक्षी गवळी या समारंभाच्या मार्गदर्शक होत्या. समारंभाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध प्रेरक वक्त्या सौ. मनिषा कदम यांनी केले. यावेळी झालेल्या विविध गीतांच्या सादरीकरणात मानकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. सोहळ्याच्या समारोपात तमाम महिला वर्गाने राष्ट्रवंदना सादर करून समारंभाची सांगता केली.*