मलकापूर प्रतिनिधी
वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त असतांना जनतेला पुन्हा महागाईचा खाईत लोटण्याचा निर्णय घेण्यात आला असून १८ जुलैपासून आता अनेक दैनंदिन वस्तूंसाठी नागरिकांना जास्त पैसे मोजावे लागत आहेत.आजवर करमुक्त असलेल्या स्थानिक डेअरी आणि कृषी उत्पादने ह्यावर देखील जीएसटी लादण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे महागाईत वाढ झालेली आहे ही अवाजवी दरवाढ रद्द करण्यात यावी यासाठी मलकापूर येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बुलडाणा जिल्हा महासचिव अतिशभाई खराटे यांचे नेतृत्वात आंदोलन करण्यात आले
जीएसटी काऊन्सिलच्या ४७ व्या बैठकीनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १८ जुलैपासून काही नवीन उत्पादने आणि काही वस्तू आणि सेवांवरील जीएसटीचे दर वाढ जाहीर केली आहे. या बैठकीत नॉन-ब्रँडेड पण पॅकेज्ड स्थानिक डेअरी आणि कृषी उत्पादने ५ टक्के कर दर स्लॅब अंतर्गत आणण्यासाठी राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या पॅनेल आणि फिटमेंट कमिटीच्या शिफारशी स्वीकारण्यात आल्या आहे. त्यानुसार जीवनावश्यक वस्तूवर दरवाढ झालेली आहे.त्यामुळे गोरगरिबांना अधिकच हाल अपेष्टा सहन कराव्या लागणार असल्याने ही दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्राचे राज्यपाल यांना उपविभागीय अधिकारी मलकापूर यांचेमार्फत दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे
यावेळी केंद्र सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करीत निषेध करण्यात आला
या आंदोलनप्रसंगी उपस्थित जिल्हा उपाध्यक्ष यशवंत कळासे,जिल्हा संघटक भाऊराव उमाळे,जेष्ठ नेते नारायणराव जाधव, ता.महासचिव नरसिंग चव्हाण,ता.उपाध्यक्ष गजानन झनके, विलास तायडे,यासीन कुरेशी,राजेंद्र वानखेडे,महीला शहर अध्यक्षा अलमनुरबी, ता.संघटक समाधान चव्हाण,ता.सदस्य दिनकर पाटील,मधुकर निकम, नितीन वानखेडे, सापूर्डा सोनोने,शशिकांत सावळे,भगवान उन्हाळे,जनार्दन कोंगळे,एकनाथ इंगळे, आदी उपस्थित होते