मलकापूर प्रतिनिधी
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समितीच्या वतीने जिल्हाभर तिरंगा जनजागरण रथयात्रेचे आयोजन दिनांक 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पर्यंत करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने मलकापूर शहरात दिनांक 11 ऑगस्ट रोजी शहरातील प्रमुख मार्गाने तिरंगा जनजागरण रथाचे आयोजन करण्यात आले होते.
शहरातून लि. भो.चांडक विद्यालय प्रमुख मान्यवरांच्या हस्ते भारत मातेचे विधीवत पूजन करून तिरंगा यात्रेचा प्रारंभ होऊन शहरातील प्रमुख मार्गाने तिरंगा जनजागरण रथयात्रा 250 फुटाच्या तिरंगा झेंड्या सहित शहरातील प्रमुख मार्गाने काढण्यात आली. हा 250 फुटाचा झेंडा या तिरंगा रथयात्रेचा विशेष आकर्षण ठरला होता.
यावेळी प्रमुख वक्ते म्हणून बोलताना बजरंग दलाचे विदर्भ प्रांत संयोजक एडवोकेट अमोल अंधारे यांनी बोलताना सांगितले की आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पुर्ण होत असून या गौरवशाली पर्वा निमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समिती च्यावतिने हर घर तिरंगा ध्वज उपक्रम राबविण्यात येत आहे.
तसेच जनजागरण करुन आपल्या तिरंगा ध्वजाचे कुठेही अवमान होणार नाही याची प्रत्येक भारतीय नागरिकाने दक्षता घेऊन आपल्या घरावर तिरंगा ध्वज राष्ट्र स्वाभीमानाने उभारून एकात्मतेचे दर्शन घडवावे. या करिता आपल्या मलकापूर शहरा मध्ये दि.११ ऑगस्ट २०२२ तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे असे ते बोलत होते.
या कार्यक्रमामध्ये सर्व माजी सैनिक यांना उपस्थिति मातृशक्ति, ब्रह्माकुमारी भगिनी द्वारे राख्या बांधण्यात आल्या. तिरंगा रथ यात्रेमध्ये मध्ये अश्वस्वार भारत माता जीवत देखावा, बाल सैनिक जीवत देखावा, तसेच जनजागृति एलसीडी रथ होते.
जन जागृती तिरंगा रथ यात्रा हुतात्मा अब्दुल हामिद चौक, कोंडवाडा रोड , लखानी चौक, जुने गावं, पोलीस चौकी नंबर एक समोर, मंगल गेट, किल्ला चौक, नसवाला चौक , पोलीस चौकी नंबर एक समोरून, छोटा बाजार, गांधी चौक, निमवाडी चौक, स्टेशन रोड, तहसील चौक, बुलढाना रोड येथून हुतात्मा संजयसिंह राजपूत स्मारक इथे रथयात्रा काढण्यात आली.यामार्गा वरील सर्व क्रन्तिकारी कारक, वीर हुतात्मा, थोर महापुरुष यांना पुष्प माला समिति सदस्य यांनी अर्पित केल्या शहीद संजय सिंह राजपूत यांच्या स्मारकास पुष्पचक्र अर्पित करुन मानवंदना देऊन सामूहिक राष्ट्रगीताने तिरंगा जनजागरण रथयात्रेचे समारोप करण्यात आला.
तिरंगा रथयात्रा मध्ये मलकापूर शहर व तालुक्यातील माजी सैनिक, जनता कला वाणिज्य महाविद्यालयाचे एन.सी.सी. पथक, विद्यार्थी,विद्यार्थिनी, महिला ,शहरातील सर्व समाजाचे प्रमुख, तसेच प्रतिष्ठित मान्यवर, व्यवसायिक, विविध सामाजिक संघटना, विविध राजकीय पक्ष, पत्रकार, पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, नगरपरिषद प्रशासन,यांचे विशेष सहकार्य लाभले. भर पाऊस असल्यावर ही या यात्रेत सहभाग घेउन आपले देश प्रेम वक़्त7 करनाऱ्या तमाम मलकापुर वासियांना अभिनंदन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समितीने मानले