Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

जिल्हा परिषद मैदानावर 7000 विद्यार्थ्यांनी गायले सामूहिक राष्ट्रीय गीत

 

मलकापूर प्रतिनिधी

 स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव अंतर्गत नगरपालिका प्रशासन, तहसील कार्यालय, गट शिक्षण समिती यांच्या वतीने आज दिनांक 9 ऑगस्ट रोजी सामुदायिक राष्ट्रगीत गायन चे आयोजन जिल्हा परिषद मैदान मलकापूर येथे करण्यात आले होते. सामुदायिक राष्ट्रगीता मध्ये सहभागी होतांना विद्यार्थिनी या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार राजेश एकडे, मा. नगराध्यक्ष हरीश रावळ, उपविभागीय पोलिस अधिकारी अभिनव त्यागी एसडीओ मनोज देशमुख, गट शिक्षण अधिकारी निखील भुयार, तहसीलदार राजेश सूरडकर, मुख्य अधिकारी रमेश ढगे माजी उपनगराध्यक्ष जमादार यांची उपस्थिती होती. या सामुदायिक राष्ट्रगीता मध्ये मलकापूर शहरातून 18 विद्यालयाने सहभाग नोंदविला होता. 

   सामुदायिक राष्ट्रगीता मध्ये सहभागी होतांना विद्यार्थीनी यामध्ये अली अलाना हायस्कूल चे 305 विद्यार्थी, भारत भारती कॉन्व्हेंट 57 विद्यार्थी, गोविंदा विष्णू विद्यालय 618 विद्यार्थी, हिराबाई कन्या विद्यालय 307 विद्यार्थी, चांडक विद्यालय 1000 विद्यार्थी, एम एस एम स्कूल 400 विद्यार्थी, न.प. कन्या माध्यमिक विद्यालय 40 विद्यार्थी, मुन्सिपल हायस्कूल 515 विद्यार्थी, मौलाना आझाद हायस्कूल 241 विद्यार्थी, न. प. उच्च प्राथमिक कन्या विद्यालय 35 विद्यार्थी, नूतन इंग्लिश स्कूल 60 विद्यार्थी, नूतन विद्यालय 900 विद्यार्थी, संस्कार पब्लिक स्कूल, एस. ओ. एस स्कूल 250 विद्यार्थी, उर्दू गर्ल्स हायस्कूल 750 विद्यार्थी, झेड. ए. उर्दू हायस्कूल 971 विद्यार्थी, जनता कला वाणिज्य महाविद्यालय 175 विद्यार्थी, जिल्हा परिषद हायस्कूल 284 विद्यार्थी असे एकूण 7000 हजार विद्यार्थ्यांना सामुदायिक राष्ट्रगीताचे गायन करीत 'भारत माता की जय" अश्या घोषणा देत स्थानिक जिल्हा परिषद मैदानावर गायन केले. 
  या सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत संपूर्ण मैदान तिरंगामय केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नगरपरिषद प्राथमिक शिक्षण विभाग, प्रशासन अधिकारी रवींद्र खोटाळे सर सर्व शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कार्यक्रम यशस्वी केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजपूत सर यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याधिकारी रमेश ढगे यांनी केले.