मलकापूर प्रतिनिधी
अवैधरित्या गुटखा वाहतूक करणाऱ्या दोन आरोपी सह ईनोव्हाकार व गुटखा असा एकुण दहा लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
मलकापुर :- नॅशनल हायवे क्रं. सहा वरून धरणगाव कडून नांदुराकडे इनोव्हा कार मधून अवैधरित्या गुटखा जात असल्याची माहिती शहर पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांना मिळाल्यावरून डि.बि. पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुखदेव भोरकडे व डीबी पथकाला कारवाई संदर्भात सुचना दिल्याने ऐपीआय सुखदेव भोरकडे,पो.काॅअनिल डागोर,ईश्वर वाघ, सलीम बर्डे, आसिफ शेख,संतोष कुमावत, प्रमोद राठोड सह डी.बी पथकाने सापळा रचून सिल्वर ग्रे रंगाची टोयाटो ईनोव्हा कार एम. एच. 43 एक्स 91 98 हीस थांबवुन विचारपूस केली असता .
त्यात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व सुगंधित तंबाखू पांढरे पोतळ्यामध्ये दिसून आली पोलीस स्टेशनला सदरची गाडी आणून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटका व सुगंधी तंबाखू किंमत 90 हजार रुपये, सिल्वर रंगाची टोयाटो ईनोव्हा कार किंमत 9 लाख रुपये, दोन मोबाईल दहा हजार रुपये असा एकूण दहा लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला .
कारमधील आरोपी शेख अजीम शेख फकीर मोहम्मद वय वीस वर्ष रा. मदिना मस्जीद जवळ, बर्डे प्लॉट, खामगाव ता. खामगाव जि. बुलढाणा, शोयब रफिक गवळी व 18 वर्षे रा. बर्डे प्लॉट खामगाव. ता. खामगाव जि. बुलढाणा या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध भादवी कलम 328, 272, 273, 188 सह कलम 130/177, 158/177 मोवाका प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सपने सुखदेव भोरकडे करीत आहे.