Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

खंडाळा जवळ अपघातात बोरसर येथील एक ठार


 

प्रतिनिधि वैजापूर भारती कदम 

वैजापूर - वैजापूर ते शिवूर महामार्गावर खंडाळ्या जवळ ट्रकने मोटारसायकल ला धडक देवून झालेल्या अपघातात  तालुक्यातील बोरसर येथील एक जण ठार झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली.   बाबासाहेब सिताराम राऊत वय 45  हे वैजापूर येथे गॅरेज वर काम करतात. ते नेहमी प्रमाणे दिवसभर काम करुन घरी  दुचाकी  एम एच   41 एच 9475 वर जात असताना खंडाळा गावाजवळ  कुलभूषण कॉलेज समोर ट्रक क्र. MH 20 DE. 7794 व मोटरसायकलच्या अपघातात धडक होऊन ते गंभीर जखमी झाले होते त्यांना नातेवाईक, मित्र, यांनी संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल केले मात्र दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला.त्यांच्या पश्चात पत्नी,  दोन मुली , मुलगा असा परिवार आहे.या प्रकरणी ट्रक चालका विरुद्ध
वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.