Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

डोंबिवलीतील भोपर येथे 'भाजपा बेटी बचाओ बेटी पढाओ' या अभियानांतर्गत बिन्दूरा फाउंडेशन व जे.के.पाटील स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने सेल्फ डिफेन्स या वर्गाचे आयोजन



प्रतिनिधी: अवधुत सावंत

  आज डोंबिवलीतील भोपर येथे 'भाजपा बेटी बचाओ बेटी पढाओ' या अभियानांतर्गत बिन्दूरा फाउंडेशन व जे.के.पाटील स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने सेल्फ डिफेन्स या वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे नेते शिवाजी आव्हाड यांच्या हस्ते झाले. या वेळेस त्यांनी आपल्या भाषणात मुलीने व महिलेने सेल्फ डिफेन्स च्या पोस्टमधून आपणा स्वतःला स्वयंपूर्ण करणे आवश्यक आहे हे सांगितले. कुठल्याही संकटाचा सामना करत असताना आपल्याला त्याचा प्रतिकार करता आला पाहिजे. या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थिनींना व शिक्षकांना याची ट्रेनिंग दिली जाईल जेणेकरून भविष्यात त्याचा आपल्याला फायदा होईल. 

  या कार्यक्रमाचे वेळेस भाजपच्या बेटी बचाओ बेटी पढाओ सदस्याच्या पदाधिकारी ऍडव्होकेट बिंदू दुबे यांनी आपल्या भाषणात सेल्फ डिफेन्सचे महत्त्व सांगितले. यावेळेस सामाजिक कार्यकर्ते जे.के.पाटील स्कूल चे चेअरमन श्री गजानन पाटील, मुख्याध्यापिका मंजूषा पाटील, उपमुख्याध्यापिका, सर्व शिक्षक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.

   तीन दिवस चाललेल्या वर्गामध्ये विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना किक बॉक्सिंग व सेल्फ डिफेन्सच्या अनेक प्रकारांची ट्रेनिंग दिली जाणार आहे. यावेळी शिक्षक या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन सेल्फ डिफेन्स चे सर्व ट्रेनिंग स्वतः घेऊन नंतर भविष्यात सुद्धा विद्यार्थ्यांना दर महिना याची ट्रेनिंग देणार आहेत.