विद्यार्थ्यांनी महत्त्वाकांक्षा व मनाचीएकाग्रता वाढवून अध्ययन केले तर त्याना गुणवत्ता प्राप्त होऊ शकते त्यामुळे सुजाण नागरिक निर्माण होऊन समाजासह देशाच्या लौकीकात भर पडेल असे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक डॉ अरविंद कोलते यांनी केले श्रीकृष्ण क्रीडा मंडळ व रामेश्वर गोरले यांनी आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभात डॉ कोलते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जेष्ठ विधीज्ञ ऍड बाळासाहेब सोमण मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेशजी एकडे माजी नगराध्यक्ष सौ मंगलाताई पाटील श्रीराजेश पाटील . श्रीकिसनराव पाटील सौअर्पणाताई देशपांडे यांचे प्रमुख उपस्थित होते संताजी भवन येथे आयोजित समारंभाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजनाने करण्यात आली त्यानंतर प्रफुल जोशी शशिकांत गायकवाड विजय अनवेकर शिवम तायडे यांनी स्वागत गीत गाऊन मान्यवर उपस्थित विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे स्वागत केले त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते 103 विद्यार्थ्यांना प्रशस्त पत्र व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले डॉ.कोलते पुढे म्हणाले की सांप्रतकाळी स्पर्धेचे युग विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत सामान्य ज्ञान व विविध खेळात प्राविण्य मिळाल्याशिवाय गत्यंतर नाही असेही डॉकोलते म्हणाले आपल्या अध्यक्षीय भाषणात एड .बाळासाहेब सोमण यांनी श्रीकृष्ण क्रीडा मंडळाच्या या उपक्रमाचा गौरव करून अशा बाबीमुळे विद्यार्थ्यांना स्फूर्ती व प्रेरणा मिळेल असा आशावाद व्यक्त केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील बेलोकार सर यांनी केले तर आभार प्रदर्शन राजुभाऊ पाटील यांनी केले कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठीश्रीकृष्ण क्रीडा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अथक प्रयत्न केले