प्रतिनिधीः कोरोणा काळामुळे उद्योग ,व्यवसायानाआर्थीक फटका बसला आहे.राज्यात नव्याने उद्योग,व्यवसाय उभे राहावीत.बेरोजगारी कमी होउन तरुणांनी उद्योग,व्यवसाकडे वळावे.या उद्येशाने स्थापित झालेल्या महात्मा फुले आर्थीक विकास महामंडळ,अण्णासाहेब पाटील आर्थीक विकास महामंडळ,ओ बी सी आर्थीक विकास महामडळं,वसंतराव नाईक आर्थीक विकास महामंडळ,जिल्हा उद्योग केंद्र व ईतरही महामंडळे यांच्या उद्योग,व्यवसायाच्या थेट कर्ज योजना महामंडळा अंतर्गत सुरु कराव्यात.व त्याच प्रमाणे प्रत्येक महामंडळावर अध्यक्ष नियुक्त करावीत. जेणे करुन सद्यस्थितीत बंद असलेल्या योजना आणी नवीन योजना सुरु करता येईल. व राज्यातील होतकरु तरुणांना स्वःताहाचा व्यवसाय उभा करता येईल .अशी मागणी जिल्हाअधिकारी बुलडाणा यांच्या अंतर्गत मा.मुख्यमंञी महाराष्ट्रराज्य याच्यांकडे निवेदनाद्वारे राजे छञपती शिवाजी महाराज स्वराज्य विचार मंच महाराष्ट्र राज्य यांनी केली आहे.या निवेदनावर संस्थापक अध्यक्ष अंबादास घेंवदे,जिल्हाअध्यक्ष अनिल वाघमारे,माणीकराव नरोटे,राजु पवार,देवीदास बावीस्कार,सुनिल भाकरे,प्रल्हाद वानेरे,सदानंद वानखडे,गौतम तायडे,विजय पडोळ ,हरीओम घोरपडे आदीच्या सह्या आहेत.