वैजापूर -शालेय शिक्षण घेणाऱ्या एका युवतीचा विनयभंग करणाऱ्या युवकाविरूद्ध पोलीसात गून्हा दाखल करण्यात आला आहे.अतुल संजय कुहीले रा.जरूळ असे आरोपीचे नाव आहे.५ जानेवारी रोजी शहरातील लाडगाव रोडवरील एका मेडीकल दुकानात ही घटना घडली.या प्रकरणी गुन्हा मात्र मंगळवारी उशीरा दाखल करण्यात आला.
सदर १८ वर्षीय तरुणीला अतुल हा लाडगाव रोडवरील शिंदे हाॅस्पीटल शेजारच्या मेडीकल दुकानात घेऊन गेला.तेथे त्याने सदर तरूणीशी असभ्य वर्तन केले.तिला लज्जा वाटेल असे कृत्य त्याने केले.या प्रकरणी सदर युवतीच्या फिर्यादीवरून अतुल कुहीले विरूद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलिस नाईक सोनवणे हे करीत आहेत.