मलकापूर प्रतिनिधी
मातामहाकाली नगर ते भिमनगर पर्यत रस्ता डांबरीकरण नालीबांधकाम,पेवर्सब्लॉक बसविणे आदी कामाचा शुभारंभ माजी नगरसेवक अशांतभाई वानखेडे, अरूणभाऊ अग्रवाल, श्रीचंद शिवनदास राजपाल, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अशोकसेठ राजदेव,डॉ,सुभाष तलडेजा,रामा मेहसरे,जामोदे ठेकेदार,असलम ठेकेदार आदी मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी मातामहाकाली प्रवेश द्वारापासून शुभम पान सेंटर ते श्रीचंद शिवनदास राजपाल यांच्या घरापर्यत रस्ता डांबरीकरण व दोन्ही बाजूने पेवर्सब्लॉक बसविण्याच्या कामाचे देखील भूमीपूजन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.या कामांमूळे श्री कदमसर साहेब गुरूद्वारा या ऐतिहासिक स्थळाकडे जाणारा रस्ता प्रशस्त होऊन मंगलगेट मार्गे जुन्या गावात जाणाऱ्या तसेच मलकापूर ग्रामीण पोलिस स्टेशन कडील पारपेठ भागाच्या रहदारीस व बोदवड साठीच्या रहदारीस सुलभतेने वळविण्याची सुविधा निर्माण होईल