‘शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे’ हे प.पू.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले असून शिक्षणाच्या माध्यमातून आपण आपला व आपल्या कुटुंबाचा सर्वांगिण विकास करण्या बरोबरच आजच्या प्रवाहामध्ये येण्यासाठी विद्याथ्र्यांनी मेहनत करून उच्च शिक्षण घेवून आपले व समाजाचे नाव रोशन करावे, असे आवाहन समाजसेवक तथा कार्यक्रमाचे आयोजन भिवाभाऊ चोपडे यांनी केले.
रविवार १० जुलै रोजी दहावी, बारावी व पदवीधर गुणवंत विद्याथ्र्यांचा सत्कार व शालेय साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृह (जुने) येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आर.एन.वानखेडे गुरूजी हे होते. तर प्रमुख उपस्थितीमध्ये पु.भन्ते भोगलायन महाथेरो, प्रभाकर इंगळे, शेख युनुस, नंदुसिंह राजपूत, मुन्ना मांडोळे, इब्राहीम खान, अहिरे भाऊ, राजू वाकोडे यासह आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्याथ्र्यांना मार्गदर्शन करून त्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचे कौतुक करीत त्यांचा सत्कार करण्यात आला. तर गुणवंत विद्याथ्र्यांचा सत्कार करून त्याना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी अंदाजे २६ मुली, २५ मुलांसह आदींना पेन, लेटरबुक, रजिष्टर, वॉटरबॅग यासह आदी शालेय साहित्याचे वितरण करण्यात अले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आत्माराम मोरे यांनी तर आभार प्रदर्शन वैâलास इंगळे यांनी केले. कार्यक्रमाला बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.