मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्ताने 1जुलै रोजी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांच्याहस्ते जिल्हाधिकारी यांच्या दालनात डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये मलकापूर येथील सुप्रसिद्ध डॉक्टर मनोज पाटील अस्थिरोग तज्ञ यांचा सत्कार करण्यात आला तसेच राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणासोबत व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातूनही अन्य डॉक्टरांच्या सोबत डॉक्टर दिन साजरा करण्यात आला.
यावेळी प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये योगदान असणा-या जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. जीवने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत पाटील, डॉ. सुशील चव्हाण, डॉ. सचिन वासेकर, डॉ. मनोज पाटील, जिल्हा समन्वयक डॉ. सावके व चमू उपस्थित होती.