Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आदी शक्ती जागृत महिला मंडळ व समाजसेवक महेश म्हात्रे यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थ्याँचा सत्कार संपन्न

 

भाईंदर 18(प्रतिनिधी  ): मीरा -भाईंदर मधील सुप्रसिद्ध सामाजिक संस्था आदीशक्ती जागृत महिला मंडळ  व  समाज सेवक महेश म्हात्रे यांच्या संयुक्त विद्यमाने  परिसरातील 10 व 12 वी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्याँचा सत्कार माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या हस्ते   आंबेश हॉल ,भाईंदर पूर्व आयोजित  करण्यात आला होता .

सदर सोहळ्यादरम्यान महिलांसाठी संजय गांधी पेन्शन योजना शिबिराचही आयोजन करण्यात आल होत .विधवा आणि निराधार पेन्शन योजना ,दिव्यांग पेन्शन योजना , सिनियर सिटीझन कार्ड व महात्मा फुले योजना आदी बाबतही या कार्यक्रमात  माहिती देण्यात आली .

    या प्रसंगी नगरसेवक संजय थेराडे ,समाज सेवक दीपक सावंत ,आयोजक महेश म्हात्रे ,समाज सेविका भावना तिवारी , शासकीय अधिकारी अहिरे ,आदीशक्ती जागृत महिला मंडळाच्या अध्यक्षा काजल  नाईक ,उपाध्यक्षा सुवर्ण! कांबळे ,,सचिव अलका भोईर ,शशिकला गुप्ता ,उर्मिला तारकर ,मनाली चव्हाण ,साधना प्रधान , श्वेता लबदे ,सौ .गोसावी व आदी शक्ती महिला मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते .