Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

पुन्हा लाईट कट करण्यास आलेल्या अधिकाऱ्यांना चोप देण्याचा इशारा

चार दिवसापासून पथदिव्यांची व पाणीपुरवठा ची कट केलेली लाईन ॲड.रावळानी खांबावर चढून जोडली

मलकापूर प्रतिनिधी

मलकापुर :-तालुक्यातील वाकोडी ग्रामपंचायत हद्दीतील आदर्श नगर,तुलसी नगर, सरस्वती नगर,नालंदा नगर, वृंदावन नगर भाग 1,2,3,4 नंदनवन नगर, संताजी नगर गोकुळधाम, यशोधाम, गणपती नगर, आदी भागातील पथदिव्यांची लाईट  जि.प. ने बिल भरल्यावरही म.रा.वि.वि कंपनी कर्मचाऱ्यांनी चार दिवसांपुर्वी कट केली होती गेल्या चार दिवसांपासून या भागात अंधार होता.

     याबाबत सरपंच सिध्दार्थ हेलोडे, सचिव कैलास चौधरी सह ग्रा.प‌ सदस्यांनी म.रा.वि.वि  अधिकारी यांच्याकडे तात्काळ विद्युत पुरवठा सुरू करण्यात विनंती केली अधिकाऱ्यांनी याकडे कानाडोळा केल्याने ऐन पावसाळ्यात रस्त्यावर सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले असल्याने साप,विंचु,काटा यामुळे ग्रामस्थांच्या जिवाला धोका निर्माण होत असल्याने हि बाब लोकनेते ॲड हरीश रावळ यांना ग्रा.प.सदस्य गजानन ठोसर,अशोक राजपुत यांनी सांगितली क्षणाचाही विलंब न करता ॲड हरीश रावळ यांनी उपरोक्त नगरातील आठ पोलवर स्वतः चढून कट केलेली लाईन सुरू केली यावेळी ग्रा.प.सदस्य गजानन ठोसर,अशोकसिंह राजपुत राहुल राजपुत, रविंद्र पाटील,रवि सोनोने, शंकर पाटील,धर्मेंद्रसिंह राजपुत,प्रदिप तिवने, अंकुश तायडे सह ग्रामस्थांची उपस्थीती होती,चार दिवसांपासुन बंद असलेले पथदिवे सुरू झाल्याने ग्रामस्थांनी लोकनेते ॲड.रावळ यांचे आभार मानले.

   जि.प.ने बिल भरल्यावरही म.रा.वि.वि कंपनीने तालुक्यातील ज्या ग्रा.प.तींचे कनेक्शन कट केले असेल त्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन रावळ यांनी केले.