मेहकर प्रतीनीधी
राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम जिल्हा बुलढाणा यांच्या अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या वतीने दिनांक 24 जून शुक्रवार ला देऊळगाव माळी येथे हिवताप जनजागृती रॅली काढून नागरिकांना हिवताप व पावसाळ्यातील संसर्गजन्य आजार याविषयी माहिती देण्यात आली. तसेच एक दिवस कोरडा पाळण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आली जेणेकरून हिवताप व इतर पावसाळ्यातील संसर्गजन्य आजार याला आळा बसेल.तसेच कुठे एखादा रुग्ण आढळला तर ताबडतोब जवळील प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन डॉक्टर सुलताने यांनी केले.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुनील सुलताने, आरोग्य सहाय्यक, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी ए.एन.जाधव, औषध निर्माण अधिकारी गाभने, आरोग्य सहाय्यक डी.जी जगताप, आरोग्य सहायिका संध्या जुनगडे, आशा स्वयंसेविका, मदतनीस तसेच संपूर्ण आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.