मलकापूर प्रतिनिधी
मुंबई - नागपूर हाय वे चे सहापदरीकरण रस्ता बनविणे सुरु आहे. नांदूरा ते मुक्ताईनगर रस्त्याचे काम कल्याण टोल इंफास्टक्चर कंपनीने घेतले आहे. काम अतिशय संथगतीने होत आहे. पावसाळा सुरू झाला. रस्त्याचे काम करतांना रस्ता उंच झाल्यामुळे पावसाचे पाणी वाहण्याकरीता नियोजन करणे गरजेचे आहे मात्र त्यांनी तसे नियोजन न करता चक्क रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानात जात आहे. त्यांना काम करणे अशक्य झाले आहे.
याबाबत यांनी रस्त्याच्या ठेकेदाराला अनेकदा सांगितले परंतु ठेकेदाराने दुर्लक्ष केले. शेवटी आज व्यापाऱ्यांनी रस्ता रोको केले. सुमारे तासभराने पत्रकारांना माहिती मिळाली. त्यांच्या विनंतीवरून सदर रस्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. याबाबत SDM कार्यालयास अवगत करण्यात आले. निवेदनही देण्यात आले. योग्य कारवाई करुन रस्त्याचे काम व्यवस्थित न केल्यास गंभीर परिणामास सामोरे जावे लागेल. असे निवेदनात म्हटले आहे.