Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सहकार मित्र चंद्रकांत हरी बढे पतसंस्थेच्या बुलडाणा

 ‘सीआयडी’चे पथक चौकशीसाठी वरणगावात

‘सीआयडी’चे पथक चौकशीसाठी वरणगावात

वरणगाव (जळगाव) : येथील चंद्रकांत हरी बढे सर पतसंस्थेच्या बुलडाणा शाखेच्या घोटाळ्या प्रकरणी फरारी संशयित आरोपींच्या शोधार्थ उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सीआयडी’चे पथक वरणगाव  येथे येऊन चौकशी करून रिकाम्या हाती माघारी फिरले. 



सहकार मित्र चंद्रकांत हरी बढे पतसंस्थेच्या बुलडाणा 
 शाखेतील २०१३ मधील घोटाळाप्रकरणी बुधवारी (ता. १५) सात संचलकांना राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) पथकाने मोठ्या शिताफीने वरणगाव येथे जाऊन अटक करून त्यांना बुलडाणा येथे घेऊन गेले होते. त्यावेळी काही संचालक फरार होण्यात यशस्वी  झाले होते. परिणामी फरार संशयितांचा शोध घेण्यासाठी शनिवारी (ता. १८) सायंकाळी सातच्या सुमारास ‘सीआयडी’चे अनिल पवार यांनी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकात हरी बढे यांना चौकशीसाठी वरणगाव येथे आणले होते. मात्र त्यांना रिकामे हाताने परतावे लागले असून ग्राहंकाची कोट्यवधी रुपयांची झालेल्या फसवणुकीचा तपास सुरू असून या प्रकरणात मोठे मासे ही अटकणार सहकार मित्र चंद्रकांत बढे सर बुलडाणा शाखासह बुलडाणा जिल्ह्यातही त्यांच्या अजूनही शाखा होत्या तेथेही मेहनतीचे कष्टाचे ठेवलेल्या ठेवीत लाखो रुपयांची फसवणूक झालेली आहे तरी झालेल्या फसवणुकीची तक्रार पुराव्यानिशी संबंधितांनी गुन्हे अन्वेषण कार्यालय बुलडाणा येथे त्वरित करावी