मलकापूर सतीश दांडगे
मलकापूर येथील रसवंती, किराणा दुकान ,बस स्टँड परिसरामध्ये दुकाने येथे बाल कामगारांची पिळवणूक होत असून यामध्ये 18 वर्षाखालील बालके जास्तीत जास्त मोलमजुरी करताना दिसून आल्याने बाल कामगार अधिकारी बुलढाणा यांना माहिती मिळाली व मलकापूर येथे धडक मोहीम राबवून मलकापूर शहरातील मुख्य रस्त्यावरील 18 मुले व 18 वर्षावरील भिक्षेकरी 5 अशांचे संगोपनासाठी मोठे पाऊल उचलले आहे.
रस्त्यावर राहणाऱ्या बालकाच्या सर्वेक्षणासाठी हॉट स्पॉट घोषित करून उपरोक्त कार्यवाही आदेश जिल्हाधिकारी बुलडाणा याचे मार्फत यापूर्वी संबंधित नगर परिषद व इतरांना देण्यात आले होते . त्या नुसार तालुका दंडाधिकारी तथा अध्यक्ष बाल संरक्षण समिती मलकापूर यांच्या मार्गदर्शनात दि ०१.०६.२०२२ रोजी रस्त्यावरील बालकांचे सर्वेक्षण तसेच भिक्षेकरी सर्वेक्षणाचे आयोजन करण्यात आले असून सदर सर्वेक्षण मोहिमेत सापडून येणाऱ्या बालकाच्या काळजी आणि संरक्षणासाठी अध्यक्ष सदस्य बाल कल्याण समिती बुलढाणा यानी प्रत्यक्ष सहभागी होऊन समिती समक्ष पोहचण्यास अक्षम असणाऱ्या बालकांच्या पुनर्वसनासाठी बालकल्याण समिती अध्यक्ष उज्वला कस्तुरे , बालकल्याण जिल्हाधिकारी दिवेश मराठे,ॲड. किरण राठोड, आशा सुभागी, मंगेश खराटे ,दीपक खैरे, राठोड पोलीस, या सहा महिला बाल विकास अधिकारी अशोक मारवाडी ,तहसीलदार राजेंद्र सुरळकर ,पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत ,गटविकास अधिकारी, श्री गजानन महाराज बहुउद्देशीय शिक्षण प्रसारण संस्था अध्यक्ष सुनिता पाटील, नगरपरिषदेचे दिपक कोंडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.अमोल नाफडे यांचे सहकारी आदीसह अनेकांनी सहकार्य केले तर बालकामगार कुठे दिसल्यास 10 98 या नंबर वर संपर्क करून बाल कामगारा पासून बालकांना मुक्त करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.