मलकापूर प्रतिनिधी
मलकापूर:- शहरातुन जाणाऱ्या नळगंगा नदीपात्रात जुन्या जॅकवेल जवळ पोकलेन मशीनच्या साह्याने जलक्रांती करत नदी पात्राचे खोलीकरण स्वखर्चाने करून ॲड रावळ यांनी परिसरातील लोकांच्या विहिरी, शासकीय विंधन विहिरींसह नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा उपलब्ध व्हावा म्हणून दि.11जुन पासुन नदीपात्राचे खोलीकरण केले या खोलीकरणाचे उद्घाटन आ.राजेश एकडे यांचे हस्ते नारळ फोडुन करण्यात आले.
गत पाच ते सहा वर्षापासून ॲड हरीश रावळ पावसाळ्यापुर्वी नळगंगा नदीपात्रात ठिकठिकाणी स्वखर्चाने खोलीकरण करून नदीकाठच्या भागात जलक्रांती करीत असल्याने या भागातील खाजगी विहीरी,बोअर, शासकीय विंधनविहीरींनाही भर उन्हाळ्यात ही मोठ्या प्रमाणावर पाणी उपलब्ध असते, गतवर्षी केलेल्या नदीपात्रातील खोलीकरणामुळे जुन्या जॅकवेल जवळ आजही पाण्याचा साठा उपलब्ध आहे त्या ठिकाणी आणखी खोलीकरण केल्यास पाणीसाठा मोठ्या प्रमाणावर होऊन नदीकाठच्या सर्व नगरातील खाजगी विहीरी, बोअरवेल, शासकीय विंधन विहिरींनाही मोठ्या प्रमाणावर पाणी उपलब्ध राहणार असल्याचे रावळ यांनी सांगितले.
काल मलकापुर तालुक्यात झालेल्या दमदार पाऊस झाल्यामुळे नळगंगा नदीला पुर आल्याने जलक्रांती केलेल्या ठिकाणी लाखो लीटर पाणी साचले आज त्याची पाहणी करण्यासाठी ॲड हरीश रावळ, पाणीपुरवठा अभियंता अमित कोलते, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन ठोसर,विरसिंहदा राजपुत, पत्रकार गौरव खरे, समाधान सुरवाडे,दिपक ईटनारे, निखिल चिम, श्रीकृष्ण तायडे किशोर गणबास,नितीन परसे,सुरज जाधव,परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.