प्रतिनिधी मलकापूर
मलकापुर :- आषाढी एकादशी निमित्त पंढरपुर यात्रेसाठी मलकापुर आगारातुन आज भाविकभक्तांची पहिली बस ॲड.हरीश रावळ यांनी हिरवी झेंडी दाखवत बस चालक,वाहक, ज्येष्ठ वारकऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत आज सकाळी नऊ वाजता निघाली.
मलकापुर आगाराच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त पंढरपुर यात्रेसाठी ज्यादा बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापक दादाराव दराडे यांनी दिली.आज एम.एच.40 6249 हि पहिली बस आज सकाळी नऊ वाजता भाविक भक्तांसह मलकापुर येथुन रवाना झाली या बस चे चालक गजानन खोडके, राजेंद्र बाठे,वाहक अतुल मुके तसेच बस मधील ज्येष्ठ वारकऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत एडवोकेट रावळ यांनी पंढरपूर बसला हिरवी झेंडी दिली .
यावेळी आगार व्यवस्थापक दादाराव दराडे, पत्रकार विरसिंह राजपुत, गजानन ठोसर, गौरव खरे, समाधान सुरवाडे,दिपक ईटनारे, निखिल चिम, श्रीकृष्ण तायडे यांचेसह आगारातील मनोज पाटील, जी एस पाटील, सतीश पाटील, अख्तर हुसेन, अजय पाचपोर, खर्चे,अमन भाई, प्रदीप गोयर, अतुल सपकाळ,नंदु पाटील, गणेश बोरसे, माधुरी वाघमारे, जयश्री पारधी, प्रधान मॅडम,विनोद रवणकार,संतोष भगत, धर्मराज इंगळे, अविनाश वंजारी,जे.आर. राठोड,नंदा अंभोरे, शिवसिंग राजपुत,स्वाती अंबलकर,ताराताई क्षिरसागर यांचेसह आगारातील कर्मचारी व भाविक भक्त मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.