प्रतिनिधी
देशी बनावटीचे पिस्तुल घेवून जाणान्यास जळगाव जामोद पोलिसांनी निमखेडी ते सुनगाव रोडवरुन पकडले असून त्याच्याजवळून एका पिस्तुलासह दोन जिवंत काडतूस जन करण्यात आले आहेत. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे जळगाव जामोद पोलिसांनी काल सायंकाळी निमखेडी ते सुनगाव रोडवरील एका ढाब्यानजीक दुचाकीवर जाणान्या आकाश उर्फ सोनू भारत सावतकर (२६) रा. जळगाव जामोद याला ताब्यात घेवून त्याची झाडाझडती घेतली. यावेळी त्याच्याजवळ एक देशी बनावटीचे पिस्तुल (किं. ३ हजार) व दोन जिवंत काडतुस ( किं. ५००) आढळून आले. यावेळी पोलिसांनी पिस्तूल, काडतूस, दुबाकी, मोबाईल असे साहित्य जप्त करून सावतकर याला पोस्टेला आणले. याप्रकरणी त्याच्याविरुध्द कलम ३. २५ शस्त्र अधिनियम १९५९ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी काल अटक केलेल्या आरोपींची कसून चौकशी केली असता त्याने आणखी एकजण पिस्तूल व काडतूस घेवून येणार असल्याची माहिती दिली. यावरून जळगाव जा. पोलिसांनी आज पुन्हा निमखेडी ते सुनगाव रोडवरील नर्सरी नाल्याजवळ सापळा रचून अवतारसिंग रा. पाचोरी (मध्यप्रदेश) यास ताब्यात घेतले. यावेळी त्याची झाडाझडती घेतली असता त्याच्याजवळ देशी बनावटीचे एक पिस्तूलमह सात जिवंत काडतूस आढळून आले. पोलिसांनी त्याला अटक करून सर्व साहित्य जप्त केले आहे.