Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

काळीपुरा मलकापूर येथील वृद्धाची गळफास लावून आत्महत्या आत्महत्या

 



मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंग

मंगलगेट परीसरातील संताजी भवन जवळ राहणारे पशुपती प्पा गंभीरे वय 70 वर्षे यांनी आपल्या राहत्या घरात सायंकाळी 7:30 च्या सुमारास प्रदीर्घ आजाराला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. 

   आज सायंकाळी 7:00 च्या सुमारास वादळी हवा व पाऊस सुरु झाल्याने घरातील विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे घरातील इतर मंडळी बाहेर अंगणामध्ये बसलेली असतांना सदर वृध्दाने घरामध्ये दोरीच्या साह्याने गळफास घेतला. सदर वृध्द हे बर्याच दिवसांपासून विविध आजाराने ग्रस्त असल्याने त्यांनी कंटाळून गळफास घेतला असल्याची चर्चा परीसरातील नागरिकांकडून व्यक्त होत होती. शांत स्वभावी असलेले पशुपतीआप्पा गंभीरे यांच्या मृत्युने परीसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त होत आहे. 

त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुली, एक मुलगा, सुन, नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे.

सदर वृध्दाचा मृतदेह मलकापूर उपजिल्हा रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी आणला असुन पुढील तपास मलकापूर शहर पोलीस निरीक्षक श्री. राजपूत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे