प्रतिनिधी नागेश सुरंगे
मलकापुर तालुक्यातील नरवेल येथे ट्रक्टर चालकाचा ट्रक्टर पलटी झाल्याने त्याखाली दबून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दि. 17/05/2022 च्या संध्याकाळी 6:00 वाजेच्या दरम्यान घडली. मृत ट्रक्टर चालक किसना देवराम तायडे वय 52 वर्षे रा. नरवेल असून ते कोलते यांच्या ट्रक्टर वर ड्रायव्हर म्हणून काम करत होते. सध्या पेरणी चे दिवस असल्याने किसना तायडे हे शेताला रोटॅवैटर करुन सहा वाजेच्या सुमारास घराकडे परतत असतांना एका चढ असलेल्या ठिकाणी ट्रक्टर अचानक बंद पडून मागे येत असतांना ट्रक्टरला तीन चार पलट्या बसल्याने किसना तायडे यांचा ट्रक्टर खाली दबून जागेवरच मृत्यू झाला.हि घटना घडताच तात्काळ गावकऱ्यांनी त्यांना ट्रक्टर खालुन काढून सरपंच गिरीश कोलते यांनी त्यांना मलकापुर येथील उपजिल्हा रुग्णालयत आणले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पुढील तपास मलकापुर ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री.मिर्झा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.