प्रतिनिधी नागेश सुरंगे
वंचीत समूहाला राजसत्तेत पोहचवणे हे श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांचे ध्येय आहे, हे ध्येय पुर्ण करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी मलकापूर तालुका कार्यकर्त्यांनी कटिबध्द व कार्यरत राहावे, तसेच प्रत्येक कार्यकर्त्यानी जिवापाड मेहनत करावी कार्यकर्त्यांच्या मेहनतीनेच सत्तेपासून दूर असलेल्या वंचित घटकांना सत्ता संपादन करता येईल असे प्रतिपादन जिल्हा महासचिव अतिशभाई खराटे यांनी मलकापूर येथे सत्ता संपादन मेळाव्याप्रसंगी केले
11 जून रोजी महेश भवन,मलकापूर येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने "सत्ता संपादन मेळावा" आयोजित करण्यात आला होता.या मेळाव्याचे उद्धघाटक प्रदिपजी वानखेडे,बुलडाणा जिल्हा प्रभारी तथा स्वागताध्यक्ष अतिशभाई खराटे जिल्हा महासचिव हे होते तर अध्यक्षस्थानी दक्षशिला झनके तालुकाध्यक्षा ह्या होत्या
तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून शरदभाऊ वसतकर विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष, गणेशभाऊ चौकसे बुलडाणा जिल्हाध्यक्ष,रामकृष्ण रजाने जी.कार्यकारी अध्यक्ष, राजाभाऊ भोजने जी. प.सदस्य,एस.एस.वले सर भा.बौध्द महासभा जिल्हाध्यक्ष, विशाखाताई सावंग महीला जिल्हाध्यक्षा, प्रा. डॉ.राजकुमार सोनेकर,ॲड.अनिल इखारे जी.महासचिव,भाऊराव उमाळे जी.संघटक,रेखाताई नितोने महीला जी.उपाध्यक्षा,महेंद्र सावंग जिल्हाध्यक्ष चित्रपट संघटना,वसंतराव तायडे जी.संघटक,यशवंत कळासे जी.उपाध्यक्ष,तुळशीराम वाघ जी.सचिव,नारायणराव जाधव माजी जिल्हाध्यक्ष, निर्वूत्ती तायडे, वर्षाताई गुरव महीला जी. महासचिव,सुमनताई थाटे जी.उपाध्यक्षा, रुक्सार गुरू जिल्हाध्यक्ष तृतीयपंथी संघटना, राजू शेगोकार अध्यक्ष भा.बौ.महासभा,पुंडलिक मोरे अध्यक्ष कलावंत समिती यांची उपस्थिती होती
या मेळाव्यात जी परिषद.पंचायत समिती,नगर परिषद निवडणुकीसाठी उमेदवार चाचपणी करणेबाबत,गाव तेथे ग्राम शाखा गठित करणे, बूथ कमिटी गठित करणे, पक्षाची सदस्य नोंदणी अभियान राबविणे आदी विषयावर प्रमुख मान्यवरांनी चर्चा व मार्गदर्शन केले तथा जिल्हा प्रभारी प्रदीप वानखेडे यांनी तालुका व शहर पदाधिकाऱ्यांकडून सर्कल निहाय बांधणीचा आढावा घेतला
कार्यक्रमाचे संचालन भाऊराव उमाळे यांनी केले तर आभार अजाबराव वानखेडे यांनी मानले. मेळाव्यास विलास गुरव, शहर अध्यक्ष,अतुल पाचपोळ, शहर महासचिव, अलमनुरबी महीला शहर अध्यक्ष, सर्वस्वी ता.उपाध्यक्ष सतिश काजळे,विलास तायडे,यासीन कुरेशी,गजानन झनके,सर्वस्वी संघटक विनोद निकम,अजाबराव वानखेडे,समाधान चव्हाण,सर्वस्वी सदस्य अमोल झनके,प्रवीण के.इंगळे,भिमराज मोरे,सुखदेव इंगळे,दादाराव राणे,जनार्दन इंगळे,सर्कल अध्यक्ष महानंद वानखेडे,सुनील अहिरे,मधुकर निकम,अनिल तायडे,संजय वानखेडे,किरण इंगळे,जफर खान यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते