प्रतिनिधी नागेश सुरंगे
मलकापूर 1/6/22 येथील प्रसिद्ध विधिज्ञ ॲड. दिलीप बगाडे यांची विदर्भ विधी सल्लागार पदी तर ॲड. प्रशांत कुलकर्णी यांची बुलढाणा जिल्हा सल्लागारपदी निवड नुकतीच करण्यात आली आहे. हिंदी मराठी पत्रकार संघटनेने थोड्याच दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असून पत्रकारा वर होणारे हल्ले अन्याय अत्याचार याबाबतचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी विदर्भ विधी सल्लागार म्हणून ॲड. दिलीप बगाडे यांची निवड करण्यात आली आहे तर ॲड. प्रशांत कुलकर्णी यांची बुलढाणा जिल्हा सल्लागारपदी निवड करण्यात आली आहे. तर हिंदी मराठी पत्रकार संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष धनश्रीताई काटीकर यांनी नियुक्तीपत्र देऊन केली आहे.
त्यावेळी , श्रीकृष्ण तायडे विदर्भ समन्वयक, सतीश दांडगे विदर्भ सचिव, अजय टप विदर्भ प्रसिद्धी प्रमुख,प्रा . प्रकाश थाटे कोषाध्यक्ष , गौरव खरे जिल्हाध्यक्ष , कृष्णा मेसरे जिल्हा प्रवक्ता, उल्हास शेगोकार तालुकाध्यक्ष, स्वप्निल आकोटकर जिल्हा सचिव , नागेश सुरंगे बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुख, प्रमोद हीवराले, श्रीकृष्ण भगत तालुका सचिव योगेश कुमार सोनवणे शहर सह संघटक, धर्मेश सिंह राजपूत ,सय्यद ताहेर , अनिल धनके प्रदीप इंगळे,मलकापूर लाईव्ह मुख्य संपादक करण झनके तालुका संघटक,दिपक इटणारे शहर अध्यक्ष , हिंदी मराठी पत्रकार संघ यांच्या उपस्थितीमध्ये नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली आहे. सदर निवडीबद्दल यांच्यावर सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.