मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
मलकापूर शहरातील 40 बिघा परिसर हा उच्चभ्रू वस्ती चा तसेच या परिसरात मोठ्या प्रमाणात दवाखाने, शासकीय कार्यालये, मोठमोठे उद्योजक, नोकरदार वर्ग राहत असून या परिसरातून सर्वात जास्त कराचा भरणा नगरपरिषदेला होत असतो. परंतु नगरपरिषदेकडून आठ ते दहा दिवसांनतर फक्त 45 मिनिटे पाणी पुरवठा केला जातो. आठ ते दहा दिवसांनंतर केल्या जाणाऱ्या 45 मिनिटांचा पाणीपुरवठा हा अपुरा व अत्यल्प असून स्थानिक परिसरात हात पंप, विहिरी,इतर जलस्त्रोत वगैरे नसून पाण्याची कुठलीही सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे एकीकडे पाणी कराचा भरणा करूनही पाणी मिळत नसल्याने नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. खाजगी पाणी पुरवठादारांकडून पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना आर्थिक भुर्दंड पडत आहे सध्या कडकडीत उन्हाळ्याचे दिवस सुरू असून पाण्याची नितांत गरज व आवश्यकता असल्याने स्थानिक परिसरातील नागरिकांचा आक्रोश वाढल्याने आज स्थानिक नागरिकांकडून नगर परिषद मुख्याधिकारी यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे.
लवकरच नगरपरिषद्वारे 40 बिघा परिसराला सुरळीत पाणीपुरवठा केला जावा व 10 ते 12दिवसां ऐवजी 4-5 दिवसांनंतर तसेच 45 मिनिटांनी ऐवजी दीड तास पाणीपुरवठा केला जावा. अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे. अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. या वेळी प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष अजय टप नागेश सुरंगे,आकाश हुंबे, गौरव कथने, देवेंद्र वाघमारे,सोमेश सुरंगे,अमर थोरात,अजय निंबाळकर,प्रमोद राखोंडे,गजानन मुंधोकार, विशाल उंबरकार रवि ठोसर तसेच राष्ट्रीय समाज पक्षाच्या जिल्हाध्यक्षा धनश्रीताई काटीकर,सौ.हर्षाताई चांडक, सौ. जयाताई सुरंगे, सौ. प्रियाताई चांडक, सौ. लीलाबाई सुरंगे, द्वारकाबाई थोरात,सौ.सुनिताताई हुंबे यासह परिसरातील बहुसंख्य नागरिक, माता भगिनी उपस्थित होते.