सहकारमित्र चंद्रकांत हरी बढे पतसंस्थेचे संस्थापक चंद्रकांत बढे यांना दि १५ जुन रोजी सायंकाळच्या वेळेस बुलडाणा सीआयडी पथकाने वरणगाव येथुन अटक केले आहे. राज्यभर कार्यक्षेत्र असलेल्या या पतसंस्थेतील घोटाळ्यांबाबत अनेक ठिकाणी गुन्हे दाखल असल्याने त्यांच्या विरोधात अटक वॉरंट असल्याची माहिती पोलिसांनी दिली. जळगाव जिल्ह्यातील रायसोनी बॅकच्या नंतर आता भुसावळ वरणगाव येथील सहकारमित्र चंद्रकांत हरि बढे कोट्यवधींच्या घोटाळ्यात पोलीस कस्टडीत. कोट्यावधीचा गैरव्यवहार झाल्याचा अहवाल लेखापरिक्षकांनी दिला होता. विशेष लेखा परीक्षण विभागाने पतसंस्थेचे ऑडिट करून संस्थापक अध्यक्षांसह तत्कालीन संचालक व कार्यकारी अधिकाऱ्यांवर गैरव्यवहाराचा ठपका ठेवला होता. पतसंस्थेच्या पालघर, पुणे, सांगवी, सांगली यासह बुलडाणा जिल्ह्यतील असलेल्या शाखेत अपहार झाल्याची नोंद आहे. तसेच इतर शाखेत सुध्दा अशीच अपहार झालेली आहे.
या प्रकरणी बढेंसह तत्कालीन संचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे याप्रकरणाची सीआयडी चौकशी देखील सुरू होती. गेल्या सात ते आट वर्षापासून बढे पतसंस्थेच्या ठेवीदारांना ठेवीची रक्कम परत मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे पतसंस्थेवर अवसाहय्यक नियुक्त करण्यात आला होते. पतसंस्थेतील कार्यकारी अधिकारी मधुसूदन पाटील यांनी देखील अपहाराबाबत तक्रार केली आहे. आज दि १६ जुन रोजी त्यांना बुलडाणा जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कस्टडी दिली आहे