प्रतींनिधी बुलडाणा
बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यात २३ जून च्या दुपारी प्रचंड विजांच्या गडगडाटा सह जोरदार पाऊस पडला, आणि या दरम्यान अंगावर वीज पडल्याने तीन जण ठार तर तीन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. सोबतच एक म्हैस सुद्धा विज पडून ठार झाल्याची माहिती बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे.
संग्रामपुर तालुक्यातील पळशी झाशी गावा जवळ शेतात काम करत असताना पाऊस सुरू झाल्याने झाडाखाली आश्रय घेतलेल्या ४ जणांवर वीज कोसळली. यात रवी संजय भालटिळक, संजय उत्तमराव मारोळे दोघे ठार झाले, तर मंगेश मनोहर बारबदे व नंदकिशोर मनोहर मारोडे हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. तर जळगाव जामोद तालुक्यातील निंभोरा येथील सागर नामदेव दीघडे हे शेतात काम करत असताना त्यांच्यावर वीज पडल्याने त्यांचा मृत्यू झाला, दुसरीकडे याच तालुक्यातील खेर्डा खुर्द येथील समाधान पांडुरंग गवई व खांडवी येथील नागोराव विश्वनाथ सरोकार यांच्या मालकीची म्हैस वीज पडून मरण पावली आहे.