प्रतिनिधी नागेश सुरंगे
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची 297 वि जयंती हिंदी मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती भवनात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दै. अहिल्या राज च्या संपादिका व हिंदी मराठी पत्रकार संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा धनश्रीताई काटीकर, प्रमुख पाहुणे जेष्ठ पत्रकार उल्हासभाई शेगोकार, मुख्य अतिथी प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. प्रशांत माने, प्रहारचे जिल्हा प्रमुख अजय टप, समाजसेवक भाई आतिश खराटे हे होते.
कार्यक्रमाची सुरवात उपस्थित गणमान्य व्यक्तींनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत पुजन केले. जेष्ठ पत्रकार मा. उल्हासभाई शेगोकार यांनी उपस्थितांना अहिल्याबाई होळकर यांचा इतिहास सांगत त्या किती न्यायप्रिय होत्या तसेच त्यांनी त्यांच्या काळात मंदिरांचा केलेला जिर्णोद्धार याविषयी माहिती सांगितली, तसेच डॉ. प्रशांत माने, कार्यक्रमाच्या अध्यक्षा धनश्रीताई काटीकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले, तसेच भाई आतिश खराटे यांनी मनोगत व्यक्त केले . या कार्यक्रमाला हिंदी मराठी पत्रकार संघटनेचे पदाधिकारी श्रीकृष्ण तायडे, विदर्भ समन्वयक, गौरव खरे जिल्हा अध्यक्ष, कृष्णा मेसरे जिल्हा प्रवक्ता, सतिष दांडगे विदर्भ सचिव, नागेश सुरंगे जि संपर्क प्रमुख, स्वप्नील आकोटकरजि सचिव, श्रीकृष्ण भगत शहर सचिव , धर्मेशसिंह राजपूत संघटक, दिपक ईटनारेशहर अध्यक्ष , करन झनके तालुका संघटक, प्रदीप इंगळे, अनिल झनके, योगेश सोनवणे, प्रा. प्रकाश थाटे, प्रमोद हिवराळे सय्यद ताहेर इ. पत्रकार मंडळी तसेच हिंदी मराठी पत्रकार संघाचे विदर्भ विधीतज्ञ ऍड. दिलिप बगाडे, ऍड. प्रशांत कुलकर्णी बुलदाणा जिल्हा विधीतज्ञ यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन हिंदी मराठी पत्रकार संघटनेचे जिल्हा प्रवक्ता तथा दै. परमादेश चे संपादक प्रा. कृष्णा मेसरे यांनी केले व आभार प्रदर्शन हिंदी मराठी पत्रकार संघाचे विदर्भ सचिव सतिष दांडगे यांनी केले.
हिंदी मराठी पत्रकार संघटनेच्या विदर्भ विधी सल्लागार पदी ॲड. दिलीप बगाडे यांची
तर बुलढाणा जिल्हा सल्लागारपदी ॲड. प्रशांत कुलकर्णी यांची निवड
हिंदी मराठी पत्रकार संघटनेच्या विदर्भ विधी सल्लागार पदी ॲड. दिलीप बगाडे यांची तर बुलढाणा जिल्हा सल्लागारपदी ॲड. प्रशांत कुलकर्णी यांची निवड मलकापूर 1/6/22 येथील प्रसिद्ध विधिज्ञ ॲड. दिलीप बगाडे यांची विदर्भ विधी सल्लागार पदी तर ॲड. प्रशांत कुलकर्णी यांची बुलढाणा जिल्हा सल्लागारपदी निवड नुकतीच करण्यात आली आहे. हिंदी मराठी पत्रकार संघटनेने थोड्याच दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असून पत्रकारा वर होणारे हल्ले अन्याय अत्याचार याबाबतचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी विदर्भ विधी सल्लागार म्हणून ॲड. दिलीप बगाडे यांची निवड करण्यात आली आहे तर ॲड. प्रशांत कुलकर्णी यांची बुलढाणा जिल्हा सल्लागारपदी निवड करण्यात आली आहे. तर हिंदी मराठी पत्रकार संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष धनश्रीताई काटीकर यांनी नियुक्तीपत्र देऊन केली आहे. सदर निवडीबद्दल यांच्यावर सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
हनुमान सेना, दिव्यांग फाउंडेशन,यांना आदर्श समाज सेवा सन्मान पुरस्कार
हनुमान सेना, दिव्यांग फाउंडेशन,यांना आदर्श समाज सेवा सन्मान पुरस्कार राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती चे औचित्य साधून हिंदी मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने आदर्श समाज सेवा सन्मान पुरस्कार सन्मानित करण्यात आला यावेळी मलकापुरातील सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारी हनुमान सेना मलकापूर या संघटनेला हिंदी मराठी पत्रकार संघ यांच्या मान्यवरांनतर्फे सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले यावेळी हिंदी मराठी पत्रकार सर्व पत्रकार बांधव व हनुमान सेना, दिव्यांग फाउंडेशन, मल्हार सेना, यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते याप्रसंगी हनुमान सेना मलकापुर यांच्या समाजकार्याची दखल घेत अमोलभाऊ टप, नानाभाऊ येशी, गणेश रोठे, मंगेश देशपांडे, अमोल पाटील, राजकुमार चव्हाण इ. कार्यकर्त्यांचा तसेच दिव्यांग फाऊंडेशनचे निलेश चोपडे, संतोष गणगे, अंकीत नेमाडे इ. कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.