मलकापूर प्रतिनिधी
मलकापूर3/6/22 पोटाची खळगी भरण्यासाठी मागून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या भिक्षेकरी मुलीला लग्नाचे आमिष देऊन वेळोवेळी अतिप्रसंग करणाऱ्या नराधमाला बालकामगार अधिकारी यांनी मलकापूर येथे बालकामगार व भिक्षेकरी चे पुनर्वसनासाठी बालकल्याण समिती अध्यक्ष उज्वला कस्तुरे, बालकल्याण जिल्हाधिकारी दिनेश मराठे, ॲड. किरण राठोड, आशा सुभांगी, मंगेश खराटे, दीपक खैरे, व श्री गजानन महाराज बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक संस्था अध्यक्ष मलकापूर सुनिता पाटील यांनी सहकार्य करीत धडक मोहीम राबवली आहे. यामध्ये सदर 17 वर्षीय भिक्षेकरी पीडित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी पोलिस स्टेशन गाठून नराधमास विविध क्रमाने गुन्हे दाखल केले आहे.
तर तो कधी शेतात , तर कधी जुने कॉटन मार्केट तर कधी गजानन टॉकीज मध्ये नेऊन तो तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले याचा व्हायचा तो परिणाम झाला . अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली . त्यानंतर मात्र त्याने हातच वर केले अन् लग्न करायला नकार दिला अखेर पीडित मुलीने बाल कामगार समिती च्या मदतीने मलकापूर शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली . तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून संशयित आरोपीला अटक केली आहे.तर दी. २ जून रोजी आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आकाश अशोक सातपुते वय २ ९ , रा . यशवंत नगर , मलकापूर असे आरोपीचे नाव आहे . १७ वर्षीय अल्पवयीन पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार आकाशने तिला लग्नाचे आमिष दाखविले . त्यानंतर २ ऑक्टोबर २०१ ९ ते २५ सप्टेंबर २०२० या कालावधीत त्याने वेळोवेळी तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले . मी तुझ्याशी लग्न करणार आहे असे म्हणत तो वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करीत होता.