प्रतिनिधी
मलकापूर येथील सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे रक्तदाता मलकापूर मदतकार्य बहुउद्देशीय संस्था मलकापूर चे संस्थापक अध्यक्ष अपरेशराजे तुपकरी यांची K प्लस इंडिया न्यूज च्या विदर्भ पदावर निवड करण्यात आली आहे.सदर निवड ही संघटनेच्या महाराष्ट्र उपप्रमुख किरण ताईवाघ यांनी एका नियुक्तीपत्र द्वारे केली.
सदर नियुक्ती पत्रात इंडिया न्यूज साठी काम करून जनतेवर होणारे अन्याय अत्याचाराविरुद्ध आवाज उठवण्याचे दृष्टिकोनातून तसेच घडामोडींवर प्रकाश टाकण्याच्या उद्देशाने K प्लस इंडिया न्यूज च्या वरिष्ठांच्या आदेशान्वये सदर नियुक्ती झालेली असून याप्रसंगी अपरेश राजे तुपकरी यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
सदर नियुक्ती झाल्यामुळे त्यांचे हिंदी मराठी पत्रकार संघातर्फे अभिनंदन करते वेळी धनश्रीताई काटीकर पाटील महाराष्ट्र अध्यक्ष उल्हास भाई शेगोकार , सतीश दांडगे, गौरव खरे, नथुजी हिवराळे प्रा. प्रकाश थाटे ,नागेश सुरंगे ,अनिल गोठी, धर्मेश राजपूत इत्यादी उपस्थित होते