Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

यश संपादित करण्यासाठी कठीण परिस्थितीशी सामना करावा लागतो.. कु दिपाली फासे



    माणसाला जिवनात यश संपादित करण्यासाठी कठीण परिस्थितीशी सामना करावा लागतो असे दिपाली फासे स्वतःचे आलेले कठीण प्रसंगाचे अनुभव सांगितले.खेड्यापाड्यात दुर्गम भागात शहरा सारख्या सुखसुविधा नसलेल्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असलेल्या कुटुंबात जन्मलेल्या मुला मुलींना याची जाणीव असते.आई वडील शेत मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवत असताना मुलांच्या शिक्षणा कडे फारसं लक्ष दिलं जात नाही तरीही काही मुले मुली  जिद्द चिकाटी व मेहनत करून यश संपादित करतात.अशाच छोट्याशा खेड्या गावातील शेतकरी कुटुंबातील  कु दिपाली शत्रघुन फासे रा दादुलगाव तालुका जळगाव जामोद जिल्हा बुलडाणा या लहान खेड्यातील राहणारी आपल्या परिसरातील एकमेव मुलगी सशस्त्र सिमा सुरक्षा बल  कॉन्स्टेबल जी डी या पदावर बिहार मध्ये श्रीनगर जिल्ह्यात रुजू झाली याबद्दल धनगर समाज युवा मल्हार सेना पदाधिकारी यांनी दिपाली फासे पुष्पहार, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व देशसेवेसाठी शुभेच्छा दिल्या.

  दिपाली फासे ची ट्रेनिंगसुरू असताना वडीलाचे कोरोना काळात अकस्मात निधन झाले. तरिही अशा कठीण परिस्थितीत तिने ट्रेनिंग पुर्ण केले.अशा प्रतिकूल परिस्थितीतही तिने जिद्द चिकाटी आणि मेहनत करून यश मिळविले या बद्दल दिपाली फासे चे सर्व परिसरात कौतुक केलं जात आहे .३मे मंगळवार रोजी खंडोबा मंदिर दादुलगाव येथे धनगर समाज युवा मल्हार सेना संस्थापक अध्यक्ष मा श्री मनोज सिराम ,सौ सुजाताताई मनोज सिराम व जिल्हाध्यक्ष श्री दिलीप भिवटे यांनी कु दिपाली फासे चा हार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व देशसेवेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी कु दिपाली फासे ची आई, भाऊ मंगेश फासे, काका गजानन फासे, रामभाऊ फासे, एकनाथ भिवटे जिल्हा सचिव,प्रमोद तितरे प्रशासक कृ उ बाजार समिती जळगाव जामोद, अजय तितरे जिल्हा उपाध्यक्ष, गोपाल पातुर्डे तालुकाध्यक्ष नांदुरा, भगवान तितरे, संजय फासे, शिवाजी तितरे, राजु फासे,राजु गाडगे, रोशन तितरे व उपस्थित धनगर समाज युवा मल्हार सेना पदाधिकारी व गावातील बंधु भगिनींनी उपस्थित होते