अंगद थोटे कंधार ता.प्रतिनिधि
जि. प. कें. प्रा. शाळा कुरुळा येथील श्री थोटे दता माधवराव (सहशिक्षक) हे 36 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत त्यानिमित्त त्यांच्या सेवापूर्ती सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. मुखेड चे लोकप्रिय आमदार मा. तुषारभाऊ राठोड यांच्या उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कुरुळा बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी मा.श्री सतीश व्यवहारे साहेब होते.
प्रमुख उपस्थिती मा. मनोहर पाटील भोसीकर, कंधार पंचायत समितीचे माजी सभापती श्री रामचंद्र राठोड साहेब, श्री बाळासाहेब भोसीकर, श्री लक्ष्मण पाटील खैरकेकर, जि. प. सदस्य प्रतिनिधी श्री बाळासाहेब गोमारे, पं. स. सदस्य प्रतिनिधी श्री आत्माराम धुळगंडे, उपसरपंच श्री शिव दर्शन चिवडे, शालेय समितीचे अध्यक्ष श्री राजकुमार ढवळे, उपाध्यक्ष सौ. शिवराणी मठपती, कंधार पंचायत समितीचे माजी सभापती कालिदास गंगावारे यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक, मित्रमंडळी, व्यापारी, आप्त नातेवाईक, केंद्रांतर्गत शिक्षक, निमंत्रित समस्त शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन श्री बसवेश्वर थोटे यांनी केले तर आभार श्री भानुदास थोटे यांनी मानले