प्रतिनिधि वैजापूर भारती कदम
वैजापूर-शिव उमा बहुउद्देशीय सेवाभावी विकास संस्थेच्या वतीने जागतिक कठपुतली दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी धोंडीराम सिंह राजपूत हे होते. संस्थेचे सचिव कठपुतली कलाकार योगेश मांजरे यांनी जागतिक कठपुतली दिनाचे महत्त्व, कठपुतली चा इतिहास, सामाजिक, शैक्षणिक ,सांस्कृतिक ,राष्ट्रीय उपयुक्तता यावर पपेट शो सादर केला.
संस्थेचे अध्यक्ष अशोक मांजरे छायाबाहुलीनाट्य कलाकार यांनी केंद्रिय सांस्कृतिक मंत्रालयाची "सांस्कृतिक प्रज्ञा शोध शिष्यवृत्ती "योजना समजावून सांगितली.व संस्थेच्या तपपूर्ती १२व्या वर्धापनदिनानिमित्त दिनांक ९एप्रिल२०२२ पासून या वर्षिच्या मोफत कठपुतली प्रशिक्षण वर्गात प्रवेश घेण्याचे आवाहन केले.जाधव यांनी आभार मानले.