Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तीन अल्पवयीन मुलींना पोलीस ताब्यात

 


प्रतिनिधि वैजापूर भारती कदम 

    वैजापूर- आई वडीलांनी शिक्षणास विरोध दर्शविल्याने घर सोडून करीअर करण्यासाठी पुणे येथे जाणाऱ्या तीन अल्पवयीन मुलींना पोलीसांनी  ताब्यात घेऊन नातेवाईकांच्या ताब्यात दिले.वैजापूर ,नांदेड व रेल्वे पोलीसांनी ही कारवाई केली.या तिन्ही मुली वर्गमैत्रीणी आहेत.यात शहरातील येवला रोडवर राहणाऱ्या आंबेडकर नगर भागातील दोन सख्ख्या बहिणी व तालुक्यातील नगिना पिंपळगाव येथील एका मुलीचा समावेश आहे.

    या मुली वैजापूर येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होत्या.मात्र पुढील शिक्षण घेण्यास आई वडीलांनी असमर्थता दर्शवली होती.तर नगिना पिंपळगाव येथील सदर मुलीचे लग्न लावून देण्याचा नातेवाईकांनी विचार सुरू केला होता.हे तिन्ही मुलींना मान्य नव्हते.या कारणांमुळे वैजापूर येथील दोघी बहिणी गेल्या पंधरा दिवसांपासून लोहा जि. नांदेड येथे मामाकडे राहत होत्या.तिघींनी या विषयावर मोबाईल वर चर्चा केली.त्यानंतर करीयर करण्यासाठी पुणे येथे जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला.त्यानुसार  नगिना पिंपळगाव येथील सदर मुलगी आई वडीलांना काही  एक न सांगता नांदेडला मैत्रीणी कडे निघून गेली.यासाठी तीने १२ किलोमीटर पायी प्रवास करीत रोटेगाव रेल्वे स्थानक गाठले.  मुलगी बेपत्ता झाल्याने आई वडीलांनी वैजापूर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला.

    त्यानुसार पोलीसांनी तपास केला असता सदर मुलगी पनवेल एक्स्प्रेस ने प्रवास करीत असल्याचे लक्षात येते.नांदेड,परळी वैजनाथ,रेल्वे पोलीस व वैजापूर पोलीसांच्या पथकाने त्यांना परळी वैजनाथ रेल्वे स्थानकावर ताब्यात घेतले.आम्ही स्वतःहून करीयर करण्यासाठी पुणे येथे जात असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.पोलीसांनी त्यांना ताब्यात घेतले.मात्र त्यांनी नातेवाईकांकडे जाण्यास नकार दिला.त्यानंतर पोलीसांनी मध्यस्थी करून तसेच मनधरणी करुन नगिना पिंपळगाव येथील मुलीस नातेवाईकांच्या स्वाधीन केले.मात्र वैजापूर शहरात राहणाऱ्या मुलींनी नातेवाईकांकडे जाण्यास स्पष्ट नकार दिला.त्यांनी ऐकले नाही तर बालसुधारगृहात त्यांची रवानगी केली जाणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.वैजापूर येथे दाखल गुन्ह्याचा तपास हवालदार किसन गवळी हे करीत आहेत.