प्रतिनिधि वैजापूर भारती कदम
वैजापूर- माहीती अधिकारातील कलम ४ मधील १७ कामांची माहिती अद्ययावत करण्याचे आदेश सर्व विभाग प्रमुखांना द्यावेत अशी मागणी भ्रष्टाचार विरोधी जग आंदोलन च्या वतीने तहसिलदार यांच्या कडे करण्यात आली आहे. माहीती अधिकार कायदा १५ जुन २००५ रोजी लागू झाला.हा कायदा लागू झाल्यानंतर १२० दिवसांच्या आत कलम चार मधील १७ कामांची माहिती प्रत्येक प्राधीकरणाने म्हणजेच माहीती अधिकाऱ्याने तयार करणे आवश्यक आहे.परंतू तालुक्यातील कोणत्याही खाते प्रमुखाने ही माहिती अद्ययावत ठेवली नाही.त्यामुळे परीपुर्ण माहीती जनतेला उपलब्ध होत नाही.त्यामुळे कायद्यातील तरतुदी चा भंग होत आहे.तरी सर्व खाते प्रमुखांना ही माहिती अद्ययावत करून वेबसाइट वर टाकण्याचे आदेश द्यावेत.अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.या निवेदनावर भ्रष्टाचार विरोधी जग आंदोलन चे तालुका प्रमुख सुरेश पवार, लक्ष्मण काळे, गोकुळ सुराशे,हरी सोमवंशी ,विजय कोतकर ,संदीप वाघ यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.