प्रतिनिधि वैजापूर भारती कदम
वैजापूर- तालुक्यात जनावरे चोरणाऱ्या टोळीचा हैदोस. सुरूच असून शनिवारी रात्री तालुक्यातील शिवराई येथील दोन शेतकऱ्यांच्या दोन गाई चोरीस गेल्या आहेत.वारंवार होत असलेल्या जनावरांच्या चोरीमुळे पोलीसा समोर चांगलेच आवाहन उभे राहिले आहे.शिवराई येथील एकनाथ लक्ष्मण डिके व किरण नानासाहेब डांगे या दोघांच्या दोन गायी चोरीस गेल्या आहेत.या दोन्ही गायींची किंमत ७० हजार रुपये इतकी आहे.या प्रकरणी एकनाथ डिके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.