Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शेतकऱ्यांना पेन्शन मिळण्यासाठी आता केवायसी पूर्ण करावी लागणार



 प्रतिनिधि वैजापूर भारती कदम

    वैजापूर-पी एम किसान योजनेअंतर्गत नोंद केलेल्या शेतकऱ्यांना पेन्शन मिळण्यासाठी आता केवायसी  पूर्ण करावी लागणार आहे. मात्र केवायसी  करताना अनेक अडचणी येत असल्याने ही केवायसी शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे.प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तिन महिन्यातून एक वेळा दोन हजार रुपये असे वर्षातून तीन वेळा हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. पी एम किसान योजनेच्या पोर्टलवर नोंद केलेल्या शेतकऱ्यांना आता त्यांची केवायसी पूर्ण करावयाची आहे. त्यामध्ये मोबाईल नंबर, आधार क्रमांक, बँकेचा खाते क्रमांक, आय एफ सी क्रमांक  आदी बाबी पूर्ण केल्यानंतरच शेतकऱ्यांना पेन्शन मिळणार आहे. 

    त्यामुळे केवायसी करताना अडचणीचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण भागामध्ये इंटरनेट सेवा व्यवस्थित चालत नाही. शिवाय इंटरनेट ऑनलाइन सेवेविषयी बहुतांश शेतकऱ्यांना अधिक माहिती नसते. त्यामुळे केवायसी करताना शेतकऱ्यांची  चांगलीच धांदल उडत आहे. अशात विज पुरवठा सतत  खंडीत होत असल्याने त्याचा परिणाम दिसून येत आहे. केवायसी पुर्ण करण्यासाठी ३१  मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे.  शेतकऱ्यांकडे आता चार दिवस शिल्लक आहेत.