महेश साळुंके निफाङ तालुका प्रतिनिधी
विंचूर ता. निफाड, जि.नाशिक येथील जिव्हेश्वर मंदिरात नाशिक जिल्हा स्वकुळ साळी समाजाची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच उत्साहात संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी गणेश धोंडीराम तांबे होते. प्रथम भगवान जिव्हेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर आरती संपन्न झाली. कोरोना व इतर कारणांमुळे दिवंगत झालेल्या समाज बांधवांना याप्रसंगी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संस्थेचे माजी सेक्रेटरी दिनकर त्र्यंबके मागील सर्वसाधारण सभेचे अहवाल वाचन केले. सोनवणे सर व सोनवणे मॅडम यांनी उपस्थितांना स्पर्धा परीक्षा संबंधी मार्गदर्शन केले. तसेच भावी काळात आपल्या मुलांसाठी स्पर्धा परीक्षांचे असलेले महत्त्व स्पष्ट केले. तद्नंतर सेवानिवृत्त समाजबांधव प्रविण ढवण (विंचुर), राजेश धसे (येवला) यांचा सत्कार करण्यात आला. तसेच मोनिका केशव आचारी यांची आर.टी.ओ. पदी तसेच जयंत साळी यांची राष्ट्रवादी काँग्रेस विंचूर शहराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला. आयुषी महेश काटकर (नाशिक) व संस्कृती साळी(नांदगाव) यांचे स्कॉलरशिप परीक्षेत निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले. तसेच विंचूर येथील ज्येष्ठ समाजबांधव केशवराव ढवण, जनार्दन साळी यांचा सत्कार करण्यात आला.
सन पुढील तीन वर्षासाठी नुतन जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली. अध्यक्ष - गणेश धोंडीराम तांबे, कार्याध्यक्ष-प्रविण ढवण, उपाध्यक्ष- सुरेश सोनवणे, देविदास पंडित, अनिल दिवाणे (नाशिक), कैलास यलगट (येवला), रामदास पिंगटे (नाशिक रोड), सेक्रेटरी- किशोर घावटे (नाशिक), सह सेक्रेटरी- सुरेशचंद्र धारणकर व प्रकाश त्रंबके (नाशिक), खजिनदार- शिवाजी ढोकळे नाशिक, सहखजिनदार अमोल पारख (येवला) व देवेंद्र धरम (नाशिक), प्रसिद्धीप्रमुख हेमंत साळी व जगन्नाथ यलगट (नाशिक), सदस्य- नाशिक येथील चंद्रशेखर दातरंगे, जे.पी.साळी, जयश्री धारणकर, शोभा निचळ, गिरीश ढोकळे (सायखेडा), विजय गवते (निफाड), जयंत साळी, रोहित चौधरी (विंचूर), अनिल त्रंबके (खेडलेझुंगे), सुभाष पोतले (खेडगाव), प्रमोद निकुंभ (मनमाड) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच महाराष्ट्र स्वकुळ साळी समाज संघटनेवर यापूर्वी यापूर्वी कै. प्रकाश दिवाणे हे होते, त्यांच्या जागी जिल्ह्याच्या वतीने सुनील साळी यांची निवड करण्यात आली. या सभेस माजी अध्यक्ष प्रभाकर ढोकळे व सुनिल साळी, तसेच मोहन गायकवाड, मोरे वकील, बद्रीविशाल भंडारी, बाळासाहेब सरोदे, राजेंद्र सरोदे,अनंत साळी, अशोक चौधरी, पंकज सरोदे, चंदन पाटेकर, सचिन जथे, रोहित ढवण, उमेश ढवण, रमेश ढवण, गणेश ढवण,योगेश ढवण, तरटे सर, मनोज मानकर, अशोक कांबळे संजय साळी, शशिकला धारणकर व जिल्ह्यातील समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. शेवटी उपस्थितांचे आभार किशोर घावटे यांनी मानले व स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.