Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्काराने प्रमोद पठारे सन्मानित



     वैजापूर- तालुक्यातील भागीरथी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, नालेगाव येथील कार्यरत सहशिक्षक  प्रमोद एन. पठारे  यांना राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्काराने  सन्मानीत  करण्यात आले. माईंड गैलेक्झि  बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय दादर (पूर्व ) मुंबई या ठिकाणी राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशभरातील गुणिजणांचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 

    महाराष्ट्र फिल्म स्टेज अँड कल्चरल डेव्हलोपमेंटचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. कैलास पगारे (IAS), पुणे यशदाचे डॉ. बबन जोगदंड, प्रसिद्ध सिने अभिनेत्री व फिल्म निर्माती हेमांगी राव,संस्थेचे अध्यक्ष डॉ.प्राचार्य जगदीश राठोड, डॉ. बी. डब्लू. गायकवाड, डॉ. प्रदीप पंडित यांच्या हस्ते प्रमोद एन. पठारे यांना स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शॉल देऊन राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्काराने  सन्मानित करण्यात आले.हा  पुरस्कार मिळाल्याबद्दल गट शिक्षणाधिकारी मनीष दिवेकर, कृषी अधिकारी एच. आर. बोयनर, विलास त्रिभुवन, प्राचार्य विष्णू भिंगारदेव,प्राचार्य बी. एम. हजारे,प्रदिप दुशिंग, अनिल आल्हाट, प्रा.आबासाहेब कसबे,भरत निंबाळकर, दिलीप पठारे,रमेश बागुल,राजू शिनगारे, सिद्धार्थ भुईंगळ, रवींद्र साखरे, प्रकाश बोथरा यांनी पठारे यांचे अभिनंदन केलेआहे