प्रतिनिधि वैजापूर भारती कदम
वैजापूर. संताचे जीवन परोपकारासाठी असते.संत तुकाराम ,संत एकनाथ ,, ,ज्ञानेश्वर ,जनाबाई,मुक्ताबाई आदी. संताचे जीवन संघर्षात गेले ,सामाजिक कार्य करतांना त्यांनी कधीच लोकनिंदा व स्वार्थ बघितला नाही सदगुरु ब्रम्हलिन नारायणगिरी महाराज यांचे जीवन ही मानवी हितासाठी व बेटाच्या उत्कर्षासाठी संघर्षात गेले असल्याचे प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी केले . श्री क्षेत्र सराला बेटावर आज योगिराज गंगागिरी महाराज यांच्या कृपाशिर्वादाने ब्रम्हलिन नारायणगिरी महाराज यांच्या १३ व्या पुण्यतिथी उत्सवात आयोजित किर्तन प्रसंगी "बळीयााचे अंकित आम्ही झालो बळीवंत" संत तुकाराम महाराज यांच्या अभंग रचनेचे विवेचन करताना महंत रामगिरी महाराज की,ब्रम्हलिन नारायणगिरी महाराज याना बालपणापासुन अध्यात्माची आवड होती .अनेक महापुरुषाच्या जीवनात संघर्ष होता .
सदगुरुनी संघर्ष करुन बेटाची व्याप्ती वाढवली.संकट ही एक संधी असते,जीवनात संकटात जो मात करतो तोच यशस्वी होतो.संकटे ही जीवंत माणसाकडेच येत असतात मेलेल्या कडे नाही.नारायणगिरी महाराज हे बेटाला व समाजाला मिळालेले एक रत्न होते.असे महाराज म्हणाले . याप्रसंगी उपनगराध्यक्ष साबेर खान , जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश गलांडे ,भद्रा मारुती संस्थान अध्यक्ष मिठ्ठु बारगळ , कचरू डिके,डॉ रणजीत गायकवाड , बाबासाहेब काळे, बाळासाहेब कापसे, संदीप पारक ,अशोक डांगे ,बाळासाहेब महाराज रंजाळे ,रामभाऊ महाराज नादीकर, संदीपान महाराज, माऊली महाराज गुंजाळ, अमोल महाराज बडाख , सराला बेटाचेेे विश्वस्त मधुकर महाराज आदीसह लाखो भाविकांची उपस्थिती होती