Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

दोन वाहनांमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोन जण ठार तर चार जण जखमी



 प्रतिनिधि वैजापूर भारती कदम

    वैजापूर- वैजापूर गंगापूर रस्त्यावर ओमनी कार व मोटार सायकल या दोन वाहनांमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोन जण ठार तर चार जण जखमी झाले.हा अपघात महालगव शिवारात रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडला.कैलास गोरखनाथ लाड (२५) व ज्ञानेश्वर यादव ही दोन जण या अपघातात ठार झाली आहेत.तर आबूब ,नगर (७५) ,कृष्णा यादव (२२) रा.वडगाव व एक अनोळखी असे तीन जण या अपघातात जखमी झाले आहेत.या अपघाताची विरगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.घटनेची माहीती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय नरवाडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटना स्थळी भेट दिली.